4)अत्याधुनिक शाश्वत शास्त्र आणि जीवन आवश्यक तत्वे आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी - २

आयुष्य  बदला आपल्याला हवे तसे!

Instructor: Dr. Mangal DhendLanguage: Marathi

शिका आपल्याला हवे तसे, आपल्या सोईनुसार, वेळेनुसार हवे तितक्या वेळा विडिओ सुरु करून !

महत्वाच्या सूचना-

१)ज्या कोणाचे पैसे भरायचे आहेत त्याच्याच लॉगइन (ई-मेल व पासवर्ड) वापरून पैसे भरावेत म्हणजे त्यांना कोर्स करता येईल. (चुकीचे लॉगिन वापरल्यानंतर कुठलीही ऍडजेस्टमेंट करता येणार नाही)

२)एक लॉगिन वापरून एका कोर्स साठी फक्त एकदाच पैसे भरावेत.
३)एक लॉग इन वापरून एका पेक्षा जास्त जणांनी/ जास्त प्रमाणात एका पेक्षा जास्त डिवाइस (मोबाईल अथवा लॅपटॉप) कोर्स केल्यास तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईट द्वारे कोर्स मधून रिमूव्ह होऊ शकता!
४) विडिओ रेकॉर्ड/शेयर/डाउनलोड असे काही केल्यास त्याची नोंद होऊन तुमचे कोर्स अकाउंट ब्लॉक होऊ शकते.

Dr. Mangal Dhend

About the course

काय शिकायला मिळणार?

     १)  पिरॅमिड शास्त्र व जीवन विकास

     २)  ऑरा शास्त्र व यशस्वी जीवन

     ३)  रंगाचे शास्त्र व उपचार पद्धती

     ४)  क्रिस्टल शास्त्र व सर्व स्तरीय हीलिंग

     ५)  अत्याधुनिक ऊर्जा शास्त्र व यशस्वी जीवन

     ६)  सुदर्शन पिरॅमिड ध्यान पद्धत लेव्हल -3

    ७)शंकराचार्य निर्वाण षटकं ध्यान (विरक्ती आणि तटस्तता वाढीसाठी)
    ८) लव्ह अँड लाईट मेडिटेशन (प्रेम आणि प्रकाश ध्यान, आपल्या हायर               सेल्फ ला जोडण्यासाठी )
    ९)सुदर्शन पिरॅमिड ध्यान -३ (उच्च स्तरीय अध्यात्मिक प्रगतीसाठी)

Syllabus

CLIENT REVIEWS

🔵नाव: सौ सुजाता कदम 🔵जिल्हा: सातारा  

🔵पहाटे चार वाजता उठण्याचे मला जाणवलेले फायदे: 1)लवकर उठण्याची सवय लागली. 2)पहाटे च्या प्रसन्न वेळी वातावरणातील शुद्ध हवा, ओझोन मिळाला. 3)माझ्या मुळे बाकीचे घरातील सदस्य पण लवकर उठतात. 4) सर्व कामे लवकर होवू लागली. 

🔵पिरॅमिङ थेरपीचे मी अनुभवलेले फायदे: 1)माझा सखा कल्पवृक्ष पिरॅमीड, मला ब्रम्हांडीय उर्जेला कनेक्ट करून घरातील लोकांची व माझी शुद्धी करत आहे. संरक्षण करत आहे. 2)माझा मुलगा 2 वेळा गाडी वरून हाय वे वर पडला. याच कालावधीत, पण त्याला काहीही मेजर दुखापत झाली नाही. फक्त एकदा antiseptic cream लावले. किरकोळ जखम झाली होती. पिरॅमीड चे खूप खूप धन्यवाद..तो सर्वांना सुरक्षित ठेवत आहे. 3)मुलाने नविन मोबाईल घेतला स्वतः ला. एक बदल. 4)घरात सुसंवाद वाढला आहे. 

🔵 अग्नि प्रज्वलनचे मला जाणवलेले फरक: 1)शांत, प्रसन्न, पवित्र वातावरण निर्माण झाले. 2)अग्नी आपली वाईट कर्मे नष्ट करतो. 3)या वेळी आपले संकल्प आठवले. 4)धूप दीप चंदनपावडर, वेखंड पावडर कापूर इ.सायंकाळी केले. सकाळी तूपाचा दिवा लावला. 

🔵पाणि चार्जिंगचे झालेले फायदे: 1)आरोग्य निरोगी निरामय आहे. 2)केस गळती थांबले. चमकदार दिसतात. 3)चेहर्यावर वांग 80%कमी झाले. 4) पोटाचा घेर 1इंच कमी झाला. 5)वजन 1किलो वाढले मला वाढवायचा होते. 

  🔵 तीसर्या लेव्लच्या ध्यानाने झालेले फायदे: 1)हा ध्यान प्रकार फार उच्च लेवल चा वाटला. 2)या मधे मन भटकू न देता body layers वर लक्ष द्यायचे आहे. 3)शरीरातील अवयवांचे observation करायचे, त्यावेळी गुडघा व मान या मधे वेदना झाली पण दुर्लक्षित केले त्यामुळे 5 मिनिटांतच सर्व विसरले. 4)ध्यानात तटस्थता आणल्या मुळे वैराग्य भाव आला. 5) निरपेक्ष व निराकार शिव स्वरूप स्वतःमधे अनुभवता आले. 

 🔵 किती प्रमाणात तटस्थता अनुभवली? 80ते 90% तटस्थता अनुभवली. 🔵तुमचे कुठले संकल्प किती प्रमाणात पूर्ण झाले? 1)4 ला उठण्याची संकल्प 100/ पूर्ण 2)अध्यात्मिक प्रगतीमधे गती वाटते. 3)नाते संबंधात सुधारणा झाली आहे. 4)विहंगम शी काम करण्याचा संकल्प केला होता, तो पण लगेच पूर्ण झाला. 🌹अध्यात्मिक फायदे: 1) सर्वात महत्वाचा हा मला फायदा वाटतो. 2) मी रोज माझ्या मनाला ध्यान सुरू असताना प्रश्न विचारायचे ..(कारण हे शरीरा पासून तटस्थ व्हायचं ध्यान होते..) की सुजाता कोठे आहे ??? 🩵मला रोज वेगवेगळी उत्तरे मिळाली... 1)समोर बसली आहे. 2)शेजारी गेली आहे. 3)बाहेर गेली आहे, कधी येणार माहित नाही. 4)सुजाता येथे रहात नाही, ती आमच्या कडे भाड्याने रहाते. 5)मी सुजाता नाहीच, सुजाता माझी मुलगी आहे. 6)एक दिवस मीच मला माझ्या पासून लांब लांब दूरवर जाताना पाहिले. 7)निर्वाण षटकात सांगितलं तसे...स्वतः शिवरूप होवून शरीरा पासून थोडा वेळ तरी मुक्त होवून ध्यान करता आले. या वेळी मी पूर्ण अवेअरनेस मधे होते. 🌹आरोग्य फायदे: 1)पोट 1 इंच कमी झाले आहे. 2)वजन 1 किलो वाढले तसेच हवे होते. 3)केस चमकदार दिसतात. 🌹जीवनात झालेले बदल: 1) कायम सकारात्मक विचार करते. 2)वर्तमान काळात जगते. 3)भूत, भविष्यासाठी काळजी करत नाही. 4)Acceptance वाढला आहे. 5)Attachment कमी झाली आहे. 6)आत्म विश्वास वाढला आहे. 🌹झालेली कामे: 1)घराची स्वच्छता 2)नवीन वाॅर्डरोब करून घेतला. बजेट मधे काम झाले. 3)मुलीचा पगार वाढला. 🔵 झालेले इतर विशेष फायदे: 1)ध्यानात प्रगती 2)विहंगम बरोबर काम करण्यासाठी मिळाली संधी. 3)अध्यात्मिक वाचन वाढले. 4)Autobiography of Yogi..या पुस्तकाचे वाचन चालू आहे. ❤️शारिरीक फायदे: काम करण्याची कार्यक्षमता वाढली. ❤️मानसिक फायदे: पेशंन्स खूप वाढला आहे.

⚫नाव: सौ अर्चना सुहास सोनसाळे

जिल्हा: चाराशिव  ⚫ पहाटे चार वाजता उठण्याचे मला जाणवलेले फायदे: ब्रह्म मुहूर्तावर पहाटे चार वाजता उठल्यामुळे पहाटेची ब्रह्मांडीय ऊर्जेची अनुभूती घेण्याचा लाभ मिळाला. आणि त्याचे फायदे असे की पहाटे उठून ध्यान केल्यामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटत आहे... दुपारी अजिबात झोप येत नाही.. अजिबात झोपावसं वाटत नाही....... पहाटेचे ध्यान खूप छान लागत होते आणि ब्रम्हांडीय ऊर्जा संपूर्ण शरीरराला चार्ज करते.. रोजची कामे भराभर होऊ लागली आहेत. ⚫ पहाटे उठून खिडक्या | उघडल्यानंतर जी ब्रह्मांडीय ऊर्जा आत येत होती त्यामुळे आपण आंघोळ केल्यानंतर जितके फ्रेश हो वाटत होते.. 

पिरॅमिड थेरपीचे मी अनुभवलेले फायदे: ⚫ पिरॅमिड थेरेपीमुळे खूपच सुंदर अनुभूती येत आहे.  त्यांच्यामुळे ध्यान खूप लवकर लागते.. आणि फायदेही लवकर होतात. आपल्या पाठीशी आता माझा सखा सुदर्शन आणि नित्यानंद पिरॅमिड आहे. त्याचा भरभक्कम आधार आहे ही अनुभूतीच माझा आत्मविश्वास खूप वाढवते आहे. आता आपण एकटे नाही आपले सर्व संकटाचे निरसन माझा सखा पिरॅमिड करणार आहे हा विश्वास मनामध्ये कायमचा बसला आहे. सर्व काही चांगल्या गोष्टी घडत आहेत अग्नि प्रज्वलनचे मला जाणवलेले फरक: धूपदीप अग्नी थेरेपी मध्ये तुपाचा दिवा भीमसेनी कापूर आणि ऊद त्यांचा वापर करून अग्निप्रज्वलन ही खूपच सुंदर अनुभूती होती मन प्रसन्न झाले सभोवतालची सगळी निगेटिव्हिटी दूर झाली सूक्ष्म अती सूक्ष्म जंतू विरहित वातावरण सगळे प्रसन्न झाले त्यामुळे पूर्ण और सुद्धा क्लीन झाला. प्रसन्न पॉझिटिव्ह झाला. सगळा परिसर शुद्ध पवित्र झाला ● घरामध्ये चैतन्य जाणवू लागले. गाईच्या तुपाचा दिवा लावून ध्यान केल्याने खूप प्रसन्न पवित्र ध्यान झाले. ⚫पाणी चार्जिंगचे झालेले फायदे: शिवोहम... शिवोहम..... या मंत्रामुळे खरोखरच आपण शिव असल्याचे अनुभूती येते आणि त्यामुळे चार्ज झालेले पाणी पिल्यामुळे दिवसभर उत्साह जाणवतो थकवा अजिबात येत नाही पोट लवकर साफ होते. चार्जड पाण्यामुळे संपूर्ण निरोगी जीवन जगण्यास सुरुवात झाली आहे. मला तीन-चार दिवस सर्दीचा खूप त्रास होत होता छातीमध्ये दुखत होते आणि नाकाचे हाड खूप दुखत होते. पण मंगल मॅडम जेव्हा म्हणाले की जेव्हा आपले काही दुखत असेल तर कोमट पाणी चार्ज करून प्या तसे मी केल्याने माझे लगेच आश्चर्यकारकरीत्या फरक जाणवला........ छातीत दुखायचे बंद झाले. आणि नाकाचे हाड दुखायचे ही थांबले. सर्दीचा त्रासही लगेच कमी झाला, चार्जड पाणी घरातील इतरांना देऊन त्यांनाही बरेच फायदे होत आहेत. अगदी जादू झाल्याप्रमाणे,... शिवस्वरोद्य नियम पाळल्याने काय अनुभवले? अतिशय मौल्यवान रहस्यमय आणि गूढ असे शिवस्वरोदय शास्त्राचे ज्ञान आम्हाला आदरणीय सौ. मंगल मॅडम मुळे प्राप्त झाले त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद शिवा स्वरोदय शास्त्रामुळे आम्हाला स्वतःचा श्वास नाकपुडी वरचा श्वास त्याबद्दलच्या ज्ञानामुळे महत्त्वाचे फायदे झाले हे अतिशय प्रभावशाली शास्त्र आहे त्याचा उपयोग अगदी विचारपूर्वक इतरांच्या फायद्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना ध्यानाचे ज्ञान देऊन जास्तीत जास्त लोकांच्या फायद्यासाठी काम करता येईल याचा प्रयत्न करीत आहे.. रोजचा स्वयंपाक करतानाही माझी आपोआपच सूर्यनाडी चालू असते आणि ध्यान करताना सुषमुना नाडी चालू असते.तो त्यापेक्षा कितीतरी पटीने फ्रेश वाटत होते.. ही अनुभूती प्रथमच अनुभवली . ⚫पहाटेच्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सानिध्यात आल्याने आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत हे प्रकर्षाने जाणवले. किती प्रमाणात तटस्थता अनुभवली? मी एक तास ध्यान करू शकते. पूर्ण वेळ तटस्थ राहू शकते. सुरुवातीला एक पाय खूप दुखायचा पण त्याकडे तटस्थपणे पाहिल्यावर ते दुखणे कमी झाले. ⚫कुठले संकल्प किती प्रमाणात पूर्ण झाले?अध्यात्मिकः ध्यानाला जोडल्या गेल्याने आणखी ध्यान करावेसे वाटू लागले आहे त्याच भावनेत राहावेसे वाटते हायर लेव्हलचे ज्ञान आणखी हायर लेवल ला जायचे आहे ही इच्छा वाढीस लागली आहे. आणि मोक्षाकडे जायचे आहे. आरोग्य: ध्यानामुळे दिवसभर ऊर्जापुरते आहे त्यामुळे शरीर न थकता काम. दुपारी झोपही येत नाही. निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत. स्किन ड्राय होती ती आता नॉर्मल झाली आहे. केस वाढले आहेत व ते गळायचे ही थांबले आहेत. कॉन्फिडन्स वाढला आहे. मन शांत झाले आहे. तटस्थ राहता येऊ लागल्याने थोडे दुखणे असेल तर त्याकडे तटस्थ पणे पाहता येत आहे. मग दुखणे जाणवत नाही. पहाटेच्या ध्याना नंतर खूप गाढ झोप लागते. जीवनात झालेले बदल सुरुवातीला इतरांबद्दल खूप सेन्सिटिव्हली विचार करायचे. आता आता तटस्थ त्याचे ध्यान केल्यामुळे थोडे आता तटस्थ राहत आहे. त्यामुळे जरा त्रास कमी झाला आहे. आतापर्यंत जे करावेसे वाटत होते त्यासाठी आत्मविश्वास कमी पडत होता. तो आता वाढलाआहे. जीवन जगण्याची कला आता मला उमजली आहे आणि प्रसन्नता वाढली. पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मकता खेचून घेते हे समजल्यामुळे सगळे पॉसिटीव्हच होणार आहे याच भावनेत राहते तटस्थता समजली आणि इतरांकडून अपेक्षा करणे कमी झाले आहे. झालेली कामे: मी छोट्या कामासाठी संकल्प केले होते ती कामे झाली आहेत. व्हिजयूअलायझेशन वापरून डान्स चा प्रोग्राम मध्ये भाग घेतला. त्यात मला बक्षीसही मिळाले आहे. झालेले विशेष फायदे: शारिरीक: व्यक्त होता येऊ लागले आहे. कॉन्फिडन्स वाढला आहे. तटस्थ राहता येऊ लागले आहे. मानसिक: मन अगदी शांत झाले आहे मनात येणारे विचार कमी झाले आहेत मौन राहण्याचा प्रयत्न करत आहे इतर: ⚫Relationship, financial, achievements, possessions, materialistic etc नातेसंबंध सुधारले आहेत. इतर कुठल्याही गोष्टींची आसक्ती नाही. मटेरियॅलिस्टिक गोष्टींमध्ये कधीही मन जास्त अडकले नव्हते किंवा गुंतले नव्हते.. मोठा बंगला किंवा गाडी असावी असे जास्त कधी वाटले नाही. ध्यानाला जोडण्यापूर्वी मी देवाजवळही कधी काही मागितले नाही. हात जोडले तर कधी काही मागितले नव्हते.. मनापासून फक्त नमस्कार कर...आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे असे मला वाटायचे मुळे मी देवालाही कधीही काही मागितले नाही.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Sudarshan Pyramid Paradise 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy